Skip to content

Commit

Permalink
Adding mr/2024-04/01-02
Browse files Browse the repository at this point in the history
  • Loading branch information
VitalikL committed Sep 30, 2024
1 parent 47f4764 commit 531dee6
Show file tree
Hide file tree
Showing 107 changed files with 966 additions and 0 deletions.
18 changes: 18 additions & 0 deletions src/mr/2024-04/01/01.md
Original file line number Diff line number Diff line change
@@ -0,0 +1,18 @@
---
title: चिन्हें जी मार्ग दाखवितात
date: 28/09/2024
---

### ह्या आठवड्याकरिता अभ्यास
योहान 2:1-11; योहान 4:46-54; योहान 5:1-16; मार्क 3:22, 23; मत्तय 12:9-14; योहान 5:16-47.

> <p>सुवर्णवचन</p>
> “या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरीही चिन्हें येशूने आपल्या शिष्यांदेखता केली; येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्‍वास धरावा आणि विश्‍वास धरुन तुम्हांला त्याच्या नामाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून ही वर्णिली आहेत” (योहान 20:30, 31).
योहानाने हे शुभवर्तमान का लिहिले? येशूने केलेल्या चमत्कारावर जोर देण्याची त्याची इच्छा होती किंवा येशूच्या काही ठराविक शिकवणीवर? त्याने जे केले ते लिहिण्यापाठीमागचे कारण काय होते?

पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि प्रभाव याखाली का त्याचे स्पष्टिकरण योहान देतो. तो म्हणतो की जरी ख्रिस्ताच्या जीवनाविषयी पुष्कळ गोष्टी लिहिता येतील (योहान 21:25), ज्या गोष्टी त्याने समाविष्ट केल्या आहेत त्या यासाठी लिहिण्यात आल्या आहेत की, “तुम्ही विश्‍वास धरावा की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, यासाठी की त्याच्या नामाने तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे” (योहान 20:31).

या आठवडी आपण येशूच्या सुरवातीच्या काही चमत्कारांचा योहानाचा वृत्तांत पाहाणार आहोत - त्याने पाण्याचा द्राक्षारस केला यापासून ते कोणाच्या तरी अतिशय आजारी मुलास बरे करणे आणि बेथसैदा तळ्याजवळील मनुष्यास बरे करणे.

योहान या सर्व चमत्कारांस “चिन्हें” म्हणतो. याचा अर्थ ते एकाद्या रस्त्यावरचे चिन्ह नव्हे, तर ती एक चमत्कारिक घटना आहे जी खोलवर सत्यतेकडे निर्देश करते; येशू एक मसीहा म्हणून. या सर्व वृत्तांतामध्ये आपण लोकांची उदाहरणे पाहातो ज्यांनी विश्‍वासाने प्रतिसाद दिला आणि त्यांची उदाहरणे आपणास तेच करण्यास आमंत्रित करीत आहेत.
22 changes: 22 additions & 0 deletions src/mr/2024-04/01/02.md
Original file line number Diff line number Diff line change
@@ -0,0 +1,22 @@
---
title: काना येथील लग्न
date: 29/09/2024
---

`योहान 2:1-11 वाचा. काना येथे येशूने कोणते चिन्ह केले आणि हे त्याच्या शिष्यांना त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यासाठी कशी मदत करते?`

पाण्याचा द्राक्षारस करण्याचा चमत्कार करीत असताना पाहाणे त्यांना एक पुरावा मिळाला की शिष्यांनी त्यास अनुसरण्याचा निर्णय घ्यावा. तो कोणीतरी देवाकडून आहे हे दाखविण्याचे हे सामर्थ्यशाली चिन्ह नव्हे काय? (कदाचित ते अद्याप तो देव आहे हे समजण्यास तयार नव्हते.)

मोशे हा इस्राएलांचा पुढारी होता आणि त्याने इस्राएल लोकांस पुष्कळ “चिन्हें आणि अद्भुते” करुन ईजिप्तमधून बाहेर काढले (अनुवाद 6:22, अनुवाद 26:8). तोच एक होता ज्याचा उपयोग देवाने इस्राएल लोकांची सुटका करण्यासाठी केला. (एकप्रकारे तो त्यांचा “तारणारा” होता.)

देवाने मोशेद्वारे भविष्यवाणी केली की एक संदेष्टा येईल जो मोशेप्रमाणे असेल. देवाने इस्राएलांना सागितले की त्याचे ऐका (अनुवाद 18:15, मतत्तय 17:5, प्रेषित 7:37). तो “संदेष्टा” येशू होता व योहान 2 मध्ये, येशूने आपला पहिला चमत्कार (चिन्ह) केला, जे स्वत:स पाठीमागे इस्राएलांची इजिप्तमधून सुटका याकडे निर्देश करते.

नील नदी ही महत्त्वाचा पुरवठा करणारी व इजिप्तच्या लोकांचे दैवत होते. एक पीडा नदीकडे वळविण्यात आली होती - त्याचे पाणी रक्तामध्ये बदलण्यात आले होते. काना येथे येशूने असाच चमत्कार केला, परंतु त्याने पाणी रक्तामध्ये बदलण्याऐवजी द्राक्षारसात बदलले.

सहा पाण्याच्या रांजणामधून पाणी आले ज्याचा उपयोग यहूदांच्या विधीमध्ये शुद्धि करणाच्या हेतुसाठी करण्यात येत असे, हा चमत्कार अधिक जवळून बायबलच्या तारणाच्या विषयाशी जोडला गेला आहे. पाण्याच्या द्राक्षरसामध्ये बदल या घटनेची उजळणी करता आणि मागे निर्गमाचा उल्लेख करता, योहान, येशू आमचा सुटका करणारा आहे याकडे निर्देश करतो.

मेजवाणी देणार्‍या घरधन्याने (यजमान) येशूने गुंगी न येणारा द्राक्षारस बनविला याबद्दल काय विचार केला? त्या पेयाची प्रत पाहून तो खरोखर आश्‍चर्यचकित झाला आणि येशूने तो चमत्कार केला आहे हे माहीत नसताना त्याला वाटले की त्यांनी उत्तम द्राक्षरस शेवटी ठेवला आहे.

ग्रीक शब्द ऑईनॉस (ेळपशी) हा दोन्ही ताजा आणि नासवण्यासाठी आलेला द्राक्षारस यासाठी वापरण्यात येतो (सेव्हंथ-डे अ‍ॅडव्हेंटिस्ट बायबल डिक्शनरी, पान 1177 पाहा). एलन जी. व्हाईट म्हणतात की जो द्राक्षारस चमत्काराने बनविला होता तो मद्यासारखा नव्हता (“अ‍ॅट मॅरेज फिस्ट”, द डिसाएर ऑफ एजस्, पान 149 पाहा). यात शंकाच नाही की, ज्यांना ठाऊक होते की काय घडले ते काय घडले यामुळे आश्‍चर्यचकित झाले होते.

`येशूला अनुसरण्यासाठी तुमच्याकडे कोणती कारणे आहेत? (आपणास पुष्कळ देण्यात आली आहेत, होय ना?)`
20 changes: 20 additions & 0 deletions src/mr/2024-04/01/03.md
Original file line number Diff line number Diff line change
@@ -0,0 +1,20 @@
---
title: गालीलामधील दुसरे चिन्ह
date: 30/09/2024
---

त्याच्या पृथ्वीवरील सर्व सेवाकार्यामध्ये येशूने जे चमत्कार केले त्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यास मदत झाली. योहानाने या चमत्कारांची नोंद केली यासाठी की इतरांनी येशूवर विश्‍वास ठेवावा.

`योहान 4:46-54 वाचा. लग्नाच्या मेजवानीच्या चमत्काराशी परत सुवार्तिक का संबंध जोडतो?`

येशूने गालीलामध्ये केलेल्या दुसर्‍या चिन्हाचा वृत्तांत देण्यात, योहान काना येथील लग्नात केलेल्या पहिल्या चिन्हाकडे निर्देश करतो. योहान असे म्हणताना दिसतो की, येशूने जी चिन्हे केली ती तुम्हांस येशू कोण आहे ते समजण्यास मदत करील. नंतर योहान त्यात भर टाकतो, “येशूने यहुदीयातून गालीलात आल्यावर पुन: जे दुसरे चिन्ह केले ते हेच” (योहान 4:54).

प्रथम, येशूने यहूदी अधिकार्‍यास दिलेला प्रतिसाद कदाचित कठोर वाटत असेल. तरीही या अधिकार्‍याने आपल्या मुलाचे बरे करणे यास येशूवर विश्‍वास ठेवण्याचा निकष मानले होते. येशूने त्याचे हृदय वाचले आणि आध्यात्मिक आजाराकडे लक्ष वेधले जो त्याच्या मुलाच्या जीवनास धोकादायक असणार्‍या आजारापेक्षा अधिक गंभीर होता. निळ्या आकाशातून चमकणार्‍या वीजेच्या प्रकाशाप्रमाणे त्या मनुष्याने ताबडतोब ओळखले की त्याची आध्यात्मिक गरीबी यासाठी त्याला त्याच्या मुलाच्या जीवाची किंमत मोजावी लागेल.

हे ओळखणे महत्त्वाचे आहे की ते चमत्कार, त्यात आणि आहेत तसे हे सिद्ध करीत नाहीत की येशू हा मसीहा आहे. इतरांनी देखील चमत्कार केले आहेत. काही खरे संदेष्ट्ये होते, काही खोटे. चमत्कार केवळ जो सर्वश्रेष्ठ आहे त्याचे अस्तित्व प्रकट करतात; ते स्वत: म्हणत नाहीत की तो केवळ देव आहे तो करतो. (सैतान देखील ते “चमत्कार” करु शकतो, जर “चमत्कार” या शब्दाद्वारे आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ कृती).

अपार दु:खाने अधिकार्‍याने स्वत:स येशूच्या दयेवर सोडले, त्याच्या मुलाला बरे करण्यासाठी त्याच्याकडे याचना केली. येशूचा प्रतिसाद पुर्न-आश्‍वासन देणारा होता. तो म्हणाला, “जा, तुझा मुलगा वाचला आहे” (योहान 4:50). “वाचला आहे” हे क्रियापद ग्रीकमध्ये वर्तमान काळात आहे. त्याचा हा वापर यास “भविष्यातील वर्तमान” असे म्हटले आहे, जेथे भविष्यातील घटना इतक्या ठामपणे बोलली जाते की जशी काही ती आताच घडत आहे. मनुष्य ताबडतोब घरी धावत गेला नाही, परंतु येशूवर विश्‍वास ठेवून, दुसर्‍या दिवशी घरी गेला आणि त्याला दिसून आले की, अगदी त्याच वेळेस जेव्हा येशू ते शब्द बोलला, त्याच्या मुलातून ताप निघून गेला.

येशुमध्ये विश्‍वास ठेवण्याचे किती सामर्थ्यशाली उदाहरण !

`जर आपण एकादा चमत्कार पाहिला, तर आधी आपण कोणती कसोटी (निकष) वापरावी की तो देवाकडून आहे?`
Loading

0 comments on commit 531dee6

Please sign in to comment.